Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

मा. आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीचे प्रतिनिधी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पाठविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर

डेहणे (खेड) : १२/०९/२०२६

मुख्य संपादक: डॉ निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री कैलास केदारी

पश्चिम पट्ट्यातील डेहणे शाखा अंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी सोसायट्यांमधील प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये सहकार क्षेत्रातील प्रश्न, शेतकरी व सभासदांचे हित तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीत माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीचे प्रतिनिधी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पाठविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने करण्यात आला.

 

पश्चिम पट्ट्यातील विविध गावांमधून या भूमिकेला प्रतिनिधींनी पाठिंबा दर्शविला. त्यामध्ये पुढील प्रतिनिधींचा समावेश आहे :

 

– शेंदुर्ली – अरुण सोमवंशी

– शिरगाव – सुरेश वाढणे

– आव्हाट – अतुल शिवाजी वाळुंज

– टोकावडे – शुभम हरिदास केदारी

– मोरोशी – शांताराम किसान हांडे

 

ग्रामीण भागातील सहकार चळवळ अधिक सक्षम करणे, शेतकरी व सभासदांच्या हिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून विकासाला चालना देणे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिनिधींनी सांगितले.

 

माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पश्चिम पट्ट्यातील डेहणे शाखेअंतर्गत येणाऱ्या सोसायटी प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीला पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!