Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

कोल्हापुरात पिण्याचा पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा, जिल्हा प्रशासनाच्या कागदी घोड्यांनी काहीच अंदाज येईना

Kolhapur Gas Petrol Diesel Crisis

कोल्हापूरमध्ये पिण्याच्या पाण्याचा शिमगा सुरू असतानाच आता पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरसाठी शिमगा करायची वेळ आली आहे.

कोल्हापूरसह जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल डिझेलचा कोणताही तुटवडा नाही असं सांगण्यात येत असलं तरी पेट्रोल पंपांवरील गर्दी कमी झालेली नाही. त्यामुळे कागदी घोडे दाखवून परिस्थिती झटकली जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेक पेट्रोल पंपांवर ती पेट्रोल नाही पेट्रोल संपल्याचे बोर्ड दिसत असल्याने सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. कोल्हापुरात आज उमा टाॅकीज चौकातील पंपावर पहाटेपासून पेट्रोल संपल्याचा बोर्ड लागला आहे.

दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये गॅस सिलेंडर बुक करून सुद्धा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!