Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

कवयित्री सुनिता नाईक-वाव्हळ यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात

३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला मान्यवरांकडून गौरवपूर्ण निरोप; ‘काव्यसुमन’ पुस्तकाचे प्रकाशन

कुरुळी : ०१/१०/०२६

मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री कैलास केदारी 

कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र कुरुळीच्या मुख्याध्यापिका तथा कवयित्री सौ. सुनिता मधुकर नाईक-वाव्हळ यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनिमित्त सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला.

या प्रसंगी खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील, शांतारामदादा सोनवणे मा.जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती खेडचे गटनेते शंकरशेठ कावडे, माजी उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ चव्हाण, भैरवनाथ विद्यालयाचे संस्थापक एम. के. सोनवणे, सचिव देवरामशेठ सोनवणे, कार्याध्यक्ष गुलाबराव सोनवणे, कुरुळीच्या सरपंच शिवगंगा सोनवणे, माजी सरपंच शरदकाका मुर्हे, अनिता बधाले, विस्तार अधिकारी टिळेकर साहेब, सोनाली झिंजुडे मॅडम, केंद्रप्रमुख सुनिल रायकर, डॉ. संदीप सांगळे, विजय वडवेराव, सचिन बेंडभर, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा धायबर, भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरात सर यांच्यासह आजी-माजी शिक्षकवृंद, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी, छत्रपती पतसंस्थेचे पदाधिकारी, कुरुळी गावचे आजी-माजी सरपंच व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात कुरुळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सौ. सुनिता नाईक-वाव्हळ यांचा सन्मान करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

सौ. नाईक-वाव्हळ या शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच कवयित्री म्हणूनही साहित्य क्षेत्रात योगदान देत आल्या आहेत. त्यांच्या काव्यलेखनाचा संग्रह असलेल्या ‘काव्यसुमन’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या साहित्यिक वाटचालीसही उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी सौ. सुनिता नाईक-वाव्हळ यांच्या ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना साहित्याचीही जोपासना करणारे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.

सेवानिवृत्तीच्या या सोहळ्यात सहकारी शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देत सौ. नाईक-वाव्हळ यांच्या कार्याचा गौरव केला. भावनिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून त्यांच्या ३८ वर्षांच्या सेवेला कृतज्ञतापूर्वक निरोप देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!