साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती व मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

राजगुरुनगर ( खेड ) दि. ५ ऑगस्ट २०२६ :
( मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिरोली येथे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पंचायत समितीचे उपसभापती मा. मंगेशभाऊ सावंत यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबाजीशेठ काळे यांनी उपस्थित राहून स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या समाजोपयोगी कार्याचे विशेष कौतुक केले. संघटना गोरगरीब, दलित, शेतकरी, कामगार व महिलांच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी सातत्याने आवाज उठवत असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षमपणे कार्यरत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार व्यक्त केले.

तसेच जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अतुलभाऊ देशमुख यांनीही जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.

याप्रसंगी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलासभाऊ केदारी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य, सामाजिक योगदान व परिवर्तनवादी विचारांचा आढावा घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हरेशभाई देखणे यांच्या पुढाकारातून गॅलेक्सी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, निदान व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या डोळ्यांची मोफत तपासणी करून घेतली. गरजू रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राज्य सदस्य दिलीपराव पालवे यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले. कु. चैतन्या विकास शिंदे हिने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त माहितीपट सादर केला. तसेच श्री. संजय ए. सावंत, श्री. संजय शिंदे, श्री. दत्ता वाळुंज, श्री. विकास शिंदे आणि सौ. निर्मलाताई देखणे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्यावर मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष मा. हरेशभाई देखणे यांनी गॅलेक्सी आय हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे तसेच उपस्थित मान्यवर, नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे राज्य उपाध्यक्ष रज्जाकभाई शेख, मा. पै. संजय सावंत (माजी सरपंच, ग्रामपंचायत शिरोली), श्री. देवराम वाडेकर (अध्यक्ष, कुलस्वामिनी अंबिका पतसंस्था), मा. संजय ए. सावंत (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), श्री. दत्ता वाळुंज (ग्रामपंचायत सदस्य), गोरक्ष सावंत (ग्रामपंचायत सदस्य), महादू सावंत (ग्रामपंचायत सदस्य), शंकर लोखंडे (ग्रामपंचायत सदस्य), काळूराम दजगुडे (उद्योजक), तुकाराम सावंत (माजी अध्यक्ष, सोसायटी), सचिन देखणे, आशा कुठे, भानुदास पवळे, बबन सावंत, शंकर सावंत, सौ. निर्मलाताई देखणे (पोलीस पाटील, शिरोली), दिलीपराव पालवे, विकास शिंदे, सोमनाथ लोंढे, गणेश पाटोळे, हेमंत पाटोळे, सौ. सुरेखा पालवे, सोनम शिंदे, सपना रोकडे, कल्पना बेंडाळे तसेच ग्रामस्थ, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्याचा तसेच समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.



