समाजमित्र पुरस्कर्ते “श्री लक्ष्मण तुकाराम औताडे” यांनी दिले, सार्वजनिक बांधकाम विभागास अल्टिमेटम

राजगुरुनगर खेड ०७/०८/२०२६ :
(मुख्य संपादक डॉ.निरंजन खंडागळे)
राजगुरूनगर- निमगाव मार्गावरील मोठया प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे नागरिक, विधार्थी, शेतकरी तसेच वाहनचालकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर वारंवार अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

त्यासाठी श्री लक्ष्मण औताडे यांनी मा. उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, राजगुरूनगर विभाग, ता. खेड, जि. पुणे यांना निवेदन दिले आहे.
श्री लक्ष्मण तुकाराम औताडे यांचे म्हणणे नुसार यापूर्वीही संबंधित विभागाला निवेदन देऊन तीन दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षाचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे.
निवेदनात त्यांनी बांधकाम विभागास अंतिम विनंती केली आहे की, गुरूवार दि. ०६/०८/२०२६ पर्यत सदर रस्ता खड्डेमुक्त करण्यात यावा. अन्यथा गुरुवार दि. ०६/०८/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून संबंधित कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान उद्भवणान्या कोणत्याही कायदेशीर अथवा प्रशासकीय परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असे त्यांनी सांगितले आहे.




