लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने खेड महसूल विभागात खळबळ
वारस नोंद लावण्यासाठी खरपूडी येथील शेतकऱ्याकडे १००००/- लाचेची मागणी करणारे तलाठी व कोतवाल अँटी करप्शन पुणे यांच्या जाळ्यात

वारस नोंद लावण्यासाठी खरपुडी येथील शेतकरी यांचेकडे तलाठी मनीषा साहेबराव माने व कोतवाल दत्तू उर्फ दत्तात्रय चव्हाण यांनी रुपये १०,०००/- ची मागणी केली होती तडजोडी अंती ५५००/- रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व कोतवाल यांना लाचलुपत प्रतिबंध विभाग पुणे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने निमगाव खंडोबा येथील तलाठी कार्यालय येथे सापळा लावून शेतकऱ्याकडून वारसनोंदी करता ५५००/- रुपये स्वीकारताना तलाठी व कोतवाल यांना रंगेहाथ पकडले. सर्व सामान्यांना प्रत्येक नोंदिकरता अडवणूक करून पैसे घेण्याचे काम तलाठी मनीषा माने व कोतवाल दत्तू चव्हाण कायम करत असतं अशी वारंवार तक्रार नागरिकांकडून येत होती अखेर शेतकऱ्याच्या तक्रारी नंतर तलाठी व कोतवाल एसीबी पुणे यांच्या जाळ्यात अडकलेच.
खरपुडी येथील शेतकरी वारस नोंद करण्याकरता तलाठी मनीषा माने यांचेकडे गेला असता तलाठी व कोतवाल यांनी वारस नोंदी करता १००००/- रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती ही रक्कम ५५००/- ठरली गेली, शेतकऱ्याने याची तक्रार एसीबी पुणे यांचेकडे केली, एसीबी पुणे यांचे पथकाने निमगाव खंडोबा येथील तलाठी कार्यालय येथे सापळा लावला आणि ५५००/- रुपयांची लाच घेताना तलाठी मनीषा माने व कोतवाल दत्तू चव्हाण यांना रंगेहाथ पकडले,
लाचलुचपत प्रतिबंध पुणे विभागाच्या कारवाईने खेड महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.



