Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जाच्या निषेधार्थ स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचा पायी निषेध मोर्चा

 

राजगुरूनगर, दि. 23 जुलै 2026 : (मुख्य संपादक डॉ. निरंजन खंडागळे)

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (NEET) संदर्भातील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी केलेल्या कथित अमानुष लाठीचार्ज तसेच आंदोलनात सहभागी अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने आज गुरुवार, दि. 23 जुलै 2026 रोजी चांडोली टोलनाका ते उपविभागीय अधिकारी (प्रांत कार्यालय) पर्यंत पायी चालत निषेध रॅली काढण्यात आली.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे पालन करत संघटनेच्या वतीने केवळ चार प्रतिनिधींच्या उपस्थितीत शांततापूर्ण पद्धतीने हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले.

या मोर्चामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कैलास केदारी, स्वप्नील गायकवाड आणि सोमनाथ लोंढे यांनी सहभाग घेतला.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जाचा तीव्र निषेध नोंदवून, विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.

स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेचा आदर राखत शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने हा निषेध मोर्चा यशस्वीरीत्या पार पाडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!