Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

ऊस उत्पादनात साहेबराव सातकर प्रथम; प्रतिहेक्टरी २७३.०५० मेट्रिक टन उत्पादन

खेड (पुणे) | २९/०९/२०२६

मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे 

सह संपादक: श्री कैलास केदारी 

खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील सातकरस्थळचे प्रगतशील शेतकरी साहेबराव परशुराम सातकर पा. यांनी गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये आडसाली ऊस उत्पादनात उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रात प्रतिहेक्टरी २७३.०५० मेट्रिक टन ऊस उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल साहेबराव सातकर यांचा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम द्रौपती लॉन्स, डांगे चौक, हिंजवडी रस्ता, वाकड, ता. मुळशी, जि. पुणे येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला होता.

ऊस उत्पादनात सातकर यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या आधुनिक शेती पद्धती, नियोजनबद्ध ऊस व्यवस्थापन आणि मेहनतीचे फलित मानले जात आहे. संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रातून प्रथम क्रमांक मिळविल्याने खेड तालुक्याच्या शेतकरी वर्गासाठीही ही अभिमानाची बाब ठरली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याच्या वतीने साहेबराव सातकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक तसेच सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहेबराव सातकर पाटील यांचे विशेष कौतुक गुळाणी नगरीचे सामाजिक कार्यकर्ते आदर्श सरपंच सर्जेराव काका पिंगळे पाटील , राज्यस्तरीय आदर्श गौरव पत्रकार पुरस्कार सन्मानीत दत्ता भगत पत्रकार व राज्यस्तरीय आदर्श संगणक तज्ञ पुरस्कार प्राप्त संदीप पिंगळे पाटील यांनी केले. 

साहेबराव सातकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेड तालुक्यासह सातकरस्थळ आणि पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी व विविध स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!