स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी मा. श्री विकास भाऊ सोपान शिंदे यांची निवड
राजगुरुनगर : २३/०८/२०२६ ( मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे ) ( सह संपादक: श्री कैलास केदारी )
श्री विकास शिंदे हे गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक श्रेत्रात कार्यरत असून त्यांनी अनेक आंदोलनात तसेच कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. खेड तालुक्यात त्यांनी त्यांच्या कार्यातून ठसा उमतविलेला असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी देण्यात आल्याचे यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हरेशभाई देखणे यांनी सांगितले आहे.
त्यांच्या संघटनेचे कार्य अधिक बळकट होऊन समाजहित, वंचित घटकांचे न्यायहक्क आणि संविधानिक मूल्यांचे संवर्धन अधिक प्रभावीपणे घडेल, अशी अपेक्षा आहे.
त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोशाचे वातावरण आहे.
राज्यस्तरीय बैठकीमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक /अध्यक्ष मा. हरेशभाई देखणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी श्री विकास सोपान शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.
पश्चिम महाराष्ट्रात संघटना वाढवून संघटनेची विचारधारा लोकांन मध्ये घेऊन जाण्याचा निर्धार श्री विकास शिंदे यांनी केला आहे.
त्यांना पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेछांचा वर्षाव होत आहे.