Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

टाइम्स ऑफ महाराष्ट्र व प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या खेड तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

राजगुरुनगर ( खेड ) : दि. ६ सप्टेंबर २०२६ :

मुख्य संपादक: डॉ निरंजन खंडागळे

सह संपादक: श्री कैलास केदारी

‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’ या डिजिटल न्यूज चॅनेल तसेच प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ, खेड तालुका जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा. बाबाजीशेठ काळे यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

 

 

 

 

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. सुनीलनाना जगताप होते.

 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यालयास तसेच पत्रकार संघाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

 

मार्गदर्शन करताना आमदार मा. बाबाजीशेठ काळे म्हणाले की, पत्रकारांनी निःपक्षपाती व निर्भीडपणे पत्रकारिता करताना समाजातील गोरगरीब, दिनदुबळ्या आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपली लेखणी व आवाज बुलंद करावा. तसेच समाजातील विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताची कामे यांना पत्रकारितेच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन त्यांना चालना मिळवून द्यावी.

 

ते पुढे म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता ही समाजातील प्रश्न, जनतेची भावना आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. बदलत्या डिजिटल युगात प्रिंटसोबतच डिजिटल माध्यमांची जबाबदारीही मोठी आहे. खेड तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ आणि सुसज्ज कार्यालय उपलब्ध होत असल्याचा मनस्वी आनंद आहे.”

 

पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून, सर्वसामान्यांच्या समस्या प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’ आणि प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे खेड तालुका जनसंपर्क कार्यालय हे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

या प्रसंगी श्री. सचिन भंडारी यांची खेड तालुका पत्रकारपदी, तर श्री. दिनेशजी झेंडे यांची शिरूर तालुका पत्रकारपदी पदनियुक्ती करण्यात आली.

 

या प्रसंगी महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे कार्याध्यक्ष इंजि. मा. दिलीपराव मेदगे, पोलीस पाटील गाव कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष मा. बाळासाहेब शिंदे,  राजगुरूनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. बापूसाहेब थिगळे, मा. हरेशभाई देखणे  (संस्थापक-अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा),  व्ही. व्ही. एस. मामा ( प्रसिद्ध रीलस्टार), जनार्दन दांडगे( राज्य कार्याध्यक्ष, प्रिंट व डिजिटल पत्रकार संघटना),  बापू काळभोर (जिल्हाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल पत्रकार संघटना),  विजय काळभोर (खजिनदार, प्रिंट व डिजिटल पत्रकार संघटना),  प्रशांत चवरे (उपाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल पत्रकार संघटना),  विश्वनाथ केसवड ( जिल्हा उपाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल पत्रकार संघटना ), संदीप बोडके (सचिव प्रिंट व डिजिटल पत्रकार संघटना ) आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच मा. अशोक कडलक, उपशिक्षणाधिकारी, सौ. निर्मलाताई देखणे (पोलीस पाटील शिरोली ), राजश्रीताई सांडभोर (नगरसेविका राजगुरूनगर नगरपरिषद), स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राज्य सदस्य दिलीपराव पालवे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ निता अल्हाट, संतोष शिंदे( जिल्हा कार्याध्यक्ष ), जयश्री शिंदे( जिल्हा कार्याध्यक्ष ), उज्वला जाधव( खेड तालुका अध्यक्षा), सुरेखा पालवे( तालुका उपाध्यक्षा ), उमेशजी जगताप सर, दिनेशजी शिंदे (कवी, मावळ तालुका ) , अमोल शिंदे ( उपसरपंच उकसान ), बाळासाहेब मुळे ( उद्योजक ), ऍडव्होकेट शुभम घाडगे, विक्रम येवले ( प्रॉप्रा. येवले मसाले व ॲग्रो ). केतन शिंदे ( उद्योजक ), ह.भ.प. सखाराम काळोखे, रमेश बांगर, मच्छिन्द्र सांडभोर (उद्योजक ), हारून शेख, नितीन भताने, खरपुडी बुद्रुकचे शुभम पवार, स्वप्नील भोगाडे, आकाश कांबळे, प्रदीप खंडागळे ,संतोष पवार, कविवर्य गझलकार सुदाम भोगाडे शास्त्री , लक्ष्मण औताडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगत सर व सुदामराव कराळे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’च्या वतीने मुख्य संपादक डॉ. निरंजन खंडागळे, सहसंपादक श्री. कैलास केदारी, तसेच प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ, खेड तालुक्याचे अध्यक्ष मनोहर गोरगल्ले आणि सर्व पत्रकार बंधूंनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!