Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

‘ राज्यस्तरीय कविवर्य गझल सम्राट २०२६ ’ पुरस्काराने सुदाम भोगाडे सन्मानित

राजगुरुनगर येथे ‘अमृत महोत्सवी जगणे सुंदर झाले’ गौरव ग्रंथाचे प्रकाशन व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

राजगुरुनगर : दि. १२ सप्टेंबर २०२६

मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री कैलास केदारी

 

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा राजगुरुनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृत महोत्सवी जगणे सुंदर झाले’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासह राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात कवी व गझलकार सुदाम भोगाडे शास्त्री यांना ‘ राज्यस्तरीय कविवर्य गझल सम्राट २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुदाम भोगाडे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सुदाम भोगाडे हे कवी, गझलकार, तसेच साहित्य क्षेत्रात सक्रिय असून त्यांच्या साहित्यकृतींना व कार्याला विविध स्तरांतून दाद मिळत आहे. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाबद्दल मान्यवरांनी यावेळी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुदाम भोगाडे शास्त्री म्हणाले, “ या प्रकाराचे श्रेय मी टाइम्स ऑफ महाराष्ट्र चे संपादक डॉ निरंजन खंडागळे यांनी मला वेळो वेळी केलेले मार्गदर्शन , मी केलेल्या कवितेचे अनेक ठिकाणी सादरीकरण , गायलेल्या गझल, केलेले अथांग परिश्रम, मित्र परिवाराने केलेले सहकार्य यामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे.”

या पुरस्काराबद्दल साहित्यिक, कवी, गझलकार, मित्रपरिवार तसेच खेड तालुक्यातील अनेक मान्यवरांकडून सुदाम भोगाडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!