Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने खेड महसूल विभागात खळबळ

वारस नोंद लावण्यासाठी खरपूडी येथील शेतकऱ्याकडे १००००/- लाचेची मागणी करणारे तलाठी व कोतवाल अँटी करप्शन पुणे यांच्या जाळ्यात

वारस नोंद लावण्यासाठी खरपुडी येथील शेतकरी यांचेकडे तलाठी मनीषा साहेबराव माने व कोतवाल दत्तू उर्फ दत्तात्रय चव्हाण यांनी रुपये १०,०००/-  ची मागणी केली होती तडजोडी अंती ५५००/- रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व कोतवाल यांना लाचलुपत प्रतिबंध विभाग पुणे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने निमगाव खंडोबा येथील तलाठी कार्यालय येथे सापळा लावून शेतकऱ्याकडून वारसनोंदी करता  ५५००/- रुपये स्वीकारताना तलाठी व कोतवाल यांना रंगेहाथ पकडले. सर्व सामान्यांना प्रत्येक नोंदिकरता अडवणूक करून पैसे घेण्याचे काम तलाठी मनीषा माने व कोतवाल दत्तू चव्हाण कायम करत असतं अशी वारंवार तक्रार नागरिकांकडून येत होती अखेर शेतकऱ्याच्या तक्रारी नंतर तलाठी व कोतवाल एसीबी पुणे यांच्या जाळ्यात अडकलेच.

खरपुडी येथील शेतकरी वारस नोंद करण्याकरता तलाठी मनीषा माने यांचेकडे गेला असता तलाठी व कोतवाल यांनी वारस नोंदी करता १००००/- रुपये लाचेची मागणी केली होती, तडजोडी अंती ही रक्कम ५५००/- ठरली गेली, शेतकऱ्याने याची तक्रार एसीबी पुणे यांचेकडे केली, एसीबी पुणे यांचे पथकाने निमगाव खंडोबा येथील तलाठी कार्यालय येथे सापळा लावला आणि ५५००/- रुपयांची लाच घेताना तलाठी मनीषा माने व कोतवाल दत्तू चव्हाण यांना रंगेहाथ पकडले,

लाचलुचपत प्रतिबंध पुणे विभागाच्या कारवाईने खेड महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!