पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; पुणे-नाशिक व चाकण-शिक्रापूर महामार्गावर नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक बडगा
पिंपरी-चिंचवड / चाकण: २१/०८/२०२६ ( मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे ) ( सह संपादक : श्री. कैलास केदारी )
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेमार्फत हद्दीतील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट आणि त्यानंतर २१ ऑगस्ट दरम्यान पुणे-नाशिक महामार्ग तसेच चाकण परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर ही धडक कारवाई करण्यात आली.

कारवाईचा सविस्तर तपशील:
कर्णकर्कश व फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेन्सर:
भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्या तसेच फटाक्यांसारखा व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकी अशा एकूण ५५ वाहनांवर थेट कारवाई करून त्यांचे बेकायदेशीर सायलेन्सर जागीच काढून जप्त करण्यात आले.
विद्यार्थी व विनापरवाना वाहनचालकांवर कारवाई:
शाळा-महाविद्यालय परिसर व महामार्गावर विनापरवाना (ड्रायव्हिंग लायसन्स नसलेले) वाहने ,
महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने:
पुणे-नाशिक महामार्गावर बेशिस्तपणे वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या २१ बसेस, ३७ इतर वाहने आणि १३ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कागदपत्रांअभावी वाहने जप्त (डिटेन):
वैध कागदपत्रे नसलेली, फॅन्सी नंबर प्लेट असलेली व गंभीर नियमभंग करणारी अनेक वाहने पडताळणीअंती चाकण वाहतूक विभागाच्या आवारात डिटेन (जप्त) करून ठेवण्यात आली आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पोलीस पथकाची कामगिरी:
सदर सर्व कारवाई मा. पोलीस आयुक्त (पिंपरी-चिंचवड) श्री. विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, ,पोलीस उपआयुक्त श्री. विक्रांत देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त जी.आर.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दिपक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक नामदेव गाडे व चाकण वाहतूक विभागाच्या सर्व पोलीस अंमलदारांनी रस्त्यावर उतरून अथक मेहनत घेतली.
वाहतूक पोलिसांचा कडक इशारा:
“इथून पुढे पुणे-नाशिक हायवे तसेच चाकण-शिक्रापूर हायवेवर जी वाहने रस्त्याच्या कडेला ‘नो पार्किंग’मध्ये लावून जातात, नियमभंग वाहनचालक , त्यांच्यावरही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि सहकार्य करावे.”
— चाकण वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड पोलीस