खरपुडी बुद्रुक येथे दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे

खरपुडी बु. खेड : ०२/१०/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
खरपुडी बुद्रुक येथे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून शेतीपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेऊन संबंधित भागातील शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्याची कार्यवाही करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची योग्य नोंद घेऊन शासनाकडून नियमानुसार मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच संबंधित कृषी विभागाने परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.


यावेळी उपस्थित मान्यवर
मोजे खरपुडी बुद्रुक येथे दुष्काळ पिक पाहणी करताना
श्रीमती शेवाळे मॅडम – मंडल अधिकारी कनेरसर ,
श्रीमती अस्मिता गायकवाड – मॅडम ग्रामपंचायत अधिकारी ,
श्री. मंगेशजी किर्वे सर — कृषी अधिकारी
श्री नवनाथ बरबटे ग्रामपंचायत कर्मचारी
सहाय्यक कृषी अधिकारी व शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते
– श्रीमती शैलाताई दाभाडे — भावी सरपंच
– श्री. शिवाजी दाभाडे — प्रगतशील शेतकरी
– श्री. नामदेवराव भोगाडे — उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, खेड तालुका
– श्री. मंगेश भोगाडे
सहाय्यक कृषी अधिकारी व खरपुडी बु. चे शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.


ठिकाण : खरपुडी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे.
दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२६
शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.

