Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

खेड तालुक्यात हॉटेलसमोर कोयता हल्ला; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

 

TIMES OF MAHARASHTRA (खेड ) : खेड तालुक्यातील रेटवडी गावात एका हॉटेलसमोर झालेल्या वादातून तरुणावर कोयता आणि विळ्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद रघुनाथ हिंगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २० मे २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेटवडी गावातील हॉटेल दर्शनच्या शेडमध्ये ते आणि त्यांचे मित्र गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी टाटा हायवा आणि ईंट्रा वाहनातून तेथे आले. आरोपींनी अमोल काळे याला जुन्या तक्रारीच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपींनी दगड, लाकडी दांडके तसेच कोयता आणि विळ्याने अमोल काळे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अमोल काळे गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांच्या वाहनांनाही धडक देत मोठे नुकसान केले. तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी अशोक कान्हू रेटवडे, दर्शन काळे, संकेत डुबे, प्रणिल पवळे, प्रवीण रामाणे तसेच अन्य अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गराड करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!