Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

खेड तालुक्यातील विविध समस्यांवर स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा आक्रमक; मागण्या मान्य न झाल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा

राजगुरूनगर ( खेड ) : 10/99/2026.                                     मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे.                                       सह संपादक: श्री कैलास केदारी.

खेड तालुक्यातील खराब रस्ते, ग्रामपंचायत निधीचा गैरवापर आणि जल जीवन मिशनमधील त्रुटी यांसारख्या गंभीर नागरी समस्यांवर स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या सर्व मागण्यांची पुढील २० दिवसांत प्रशासनाने दखल न घेतल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना (एसडीओ) निवेदनाद्वारे देण्यात आला.

स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक/अध्यक्ष हरेशभाई देखणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रमुख मागण्यांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले:

खड्डेमुक्त रस्ते व साईडपट्ट्यांची दुरुस्ती: तालुक्यातील अंतर्गत व मुख्य रस्त्यांची चाळण झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी, विद्यार्थी व चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. सर्व रस्त्यांचे खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवून साईडपट्ट्या तातडीने मजबूत कराव्यात.

ग्रामपंचायत निधी खर्चाची चौकशी: ग्रामपंचायत फंडातील १५ टक्के मागासवर्गीय निधी तसेच १५ व्या व १६ व्या वित्त आयोगांतर्गत आलेला विकासनिधी खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायती आणि जबाबदार घटकांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी.

जल जीवन मिशन कामांची झाडाझडती: योजनेअंतर्गत पूर्ण झालेली कामे त्वरित कार्यान्वित करून गावांना सुरळीत पाणीपुरवठा करावा. अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करावीत, तसेच निकृष्ट काम आणि निधीचा गैरवापर करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

प्रशासनाने नागरिकांच्या या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्यास २० दिवसांनंतर पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन उभारले जाईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

शिष्टमंडळात प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

निवेदन सादर करतेवेळी स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे संस्थापक/अध्यक्ष श्री. हरेशभाई देखणे, सरपंच संघटनेचे कुंडलिक कोहिणकर, काँग्रेस पर्यावरण विभाग राज्य उपाध्यक्ष रज्जाक शेख, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे अ‍ॅड. अरुण सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस विकास शिंदे, महिला कार्याध्यक्ष नीता आल्हाट, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटोळे, जिल्हा महिला कार्याध्यक्ष जयश्री शिंदे, खेड तालुका अध्यक्ष सोमनाथ लोंढे, आयटी सेल अध्यक्ष सोनू काळे, खेड तालुका सरचिटणीस गणेश पाटोळे, आंबेगाव तालुका अध्यक्ष नितल राजगुरू, खेड तालुका महिला अध्यक्षा उज्वला जाधव, खेड तालुका उपाध्यक्ष सुरेखा पालवे तसेच खेड तालुका संपर्कप्रमुख दिपक कोळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!