Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरपुडी बु.येथील सौ.संगीता दिघे मॅडम यांचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून सन्मान. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सोसायटी, पालक व विद्यार्थ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

राजगुरुनगर (खरपुडी बु.) : ११/०९/२०२६.                                        मुख्य संपादक: डॉ निरंजन खंडागळे.     सह संपादक : श्री कैलास केदारी.

पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळ, खरपुडी बु. येथील कर्तव्यदक्ष शिक्षिका सौ. संगीता दिघे मॅडम यांची खेड तालुका पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल खरपुडी बु. येथे उत्साहात सत्कार करण्यात आला.

शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या वतीने दिघे मॅडम यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या मेहनतीची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली.

या कार्यक्रमास श्री. नामदेवराव भोगाडे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन सतीश आप्पा तनपुरे, प्रा. कंटाळे सर, माऊलीभाऊ वाळके, ग्रामसेविका अस्मिताताई गायकवाड, नवनाथ बरबटे, कविताताई शिंदे, मळभोर ताई, मोहनराव भिसे, घोलप मॅडम यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी सौ. संगीता दिघे मॅडम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खरपुडी बु. शाळेतील शिक्षिकेची तालुकास्तरीय आदर्श शिक्षक म्हणून झालेली निवड ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

— Times of Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!