चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 47 मंडळांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत संपन्न

चाकण : २५/०९/२०२६
मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे
सह संपादक: श्री कैलास केदारी
दिनांक 25 सप्टेंबर 2026 रोजी चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच विसर्जन मिरवणुका सुरळीत व सुरक्षितपणे पार पडाव्यात यासाठी मा. श्री. मारुती जगताप, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 व मा. श्री. योगेश रांजणकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, चाकण विभाग* यांच्या नियंत्रणाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशनच्या वतीने मिरवणूक मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी 03 पोनी, 10 सपोनी/ पोउपनि, 72 पोलिस अंमलदार, 01 RCP पथक, 01 SRPF पथक, 20 होमगार्ड* असा योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत मिरवणुकांचे नियोजन व नियंत्रण करण्यात आले.
विविध गणेश मंडळांनी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात व शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका काढून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले. मिरवणुकीदरम्यान नागरिक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे सर्व विसर्जन मिरवणुका कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडल्या. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी चाकण उत्तर पोलीस स्टेशनला दिलेल्या सहकार्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.
जितेंद्र कदम ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक )
चाकण उत्तर पोलीस स्टेशन
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय