Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

देहूगावात गर्भवती पत्नीची हत्या; पतीची आत्महत्येचा प्रयत्न

शेतीच्या जमिनीच्या खरेदीवरून वाद; दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पती जखमी

देहूगाव (पुणे) :२१/०९/२०२६

मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे

सह संपादक : श्री कैलास केदारी

देहूगाव परिसरात कौटुंबिक वादातून तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीची पतीने धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पतीने स्वतःवरही वार करून घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृत महिलेचे नाव शुभांगी आकाश बरासकर (२८) असे असून, तिचा पती आकाश रामदास बरासकर (३१) हा हिंजवडीतील एका कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही देहूगावातील ओंकार सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, शेतीची जमीन खरेदी करण्याच्या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. या वादातून पहाटेच्या सुमारास आकाशने पत्नीवर धारदार वस्तूने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने स्वतःला जखमी करून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली.

घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर शुभांगी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी शुभांगी यांच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध BNS कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी जखमी असल्याने त्याला अद्याप अटक झालेली नसून, या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!