Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

३८ जणांवर ॲट्रॉसिटीसह खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल; १३ जण अटकेत.

सोलापूर: शेतफळ गावात वाद आणि मारहाण प्रकरण.

सोलापूर:२५/०९/२०२६

मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे 

सह संपादक : श्री कैलास केदारी 

मोहोळ तालुक्यातील शेतफळ गावात एका जुन्या व पूर्ववैमनस्ता कारणातून झालेल्या मारहाणीच्या गंभीर प्रकरणात ३८ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट (अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील १३ आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात ४ दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

फिर्यादी अरविंद सिद्धेश्वर थोरात (वय ४३, रा. शेतफळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास त्यांच्या घरी काही पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी आले होते. दरम्यान, गावकऱ्यांचा जमाव त्यांच्या घराकडे येत असताना पोलिसांनी त्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला, परंतु जमावाने धक्काबुक्की करत घरात प्रवेश केला.

मागील महिन्यात (श्रावण महिन्यात) झालेल्या एका भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले आणि जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आह

गुन्ह्यात दाखल असलेल्या ३८ आरोपींची नावे

या प्रकरणी पोलिसांनी खालील ३८ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:

1. अमित दत्तात्रय वागज

2. संजय उर्फ किंचु अशोक भागे

3. सोम्या उर्फ विजय अशोक भागे

4. मनोज बंडू वागज

5. अमर पमू कुंभार

6. यश संतोष झाडे

7. रोहित मोहन शेडगे

8. धनाजी प्रल्हाद वागज

9. सुरेश (बब्लू) प्रकाश गुंड

10. प्रवीण भागवत चव्हाण

11. हनुवंत जाधव

12. युवराज पुजारी

13. सचिन वागज

14. लंबू प्रकाश गुंड

15. महेश भागे

16. धनाजी मारुती वागज

17. उत्तरेश्वर खडके

18. विशाल छगन वागज

19. विजय भारत भागे

20. रोहन सिद्धेश्वर खडके

21. साहेम राजेंद्र करडे

22. ऋषिकेश चंद्रकांत करडे

23. अक्षय थोरात

24. किरण भागे

25. विकास अरुण वागज

26. रणजित विक्रम वागज

27. कुबेर खडके

28. प्रताप माळी

29. गोटू वागज

30. अविराज करडे

31. महेश दत्तात्रय खडके

32. अविराज हरी करडे

33. सिद्धू ब्रम्हदेव रणदिवे

34. रामलिंग भागे

35. छोटू पोपट चव्हाण

36. किशोर तानाजी वागज

37. सिद्धेश्वर तानाजी वागज

38. इतर १०० लोक

पोलिसांची कारवाई आणि तपास

या प्रकरणातील १३ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (Dy.SP) सुरज विठ्ठल जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला असून गावात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!