खरपुडी खुर्द येथून ५ वर्षीय बिबट्या पकडण्यात वनविभागास यश

खरपुडी खुर्द (खेड) | २५ सप्टेंबर २०२६
मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी
खरपुडी खुर्द (ता. खेड) परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाने यशस्वीपणे पकडले. सुमारे ५ वर्षे वयाचा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
खरपुडी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी तसेच रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. बिबट्याच्या हालचालींवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत होते.
वनविभागाने योग्य ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी नियोजन केले. अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
बिबट्याला पकडण्यात आल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या कारवाईचे स्वागत केले. बिबट्याला पुढील तपासणी व आवश्यक कार्यवाहीसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वनविभागाच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टळल्याने खरपुडी खुर्द परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


