Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

चाकण उत्तर पोलीस स्टेशन व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई

कंटेनरमधून सुमारे ९३ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा,पानमसाला जप्त; चालकास अटक इतर आरोपीचा शोध चालू.

चाकण : १८/०९/२०२६

मुख्य संपादक : डॉ निरंजन खंडागळे 

सह संपादक: श्री कैलास केदारी 

दि. १८/०९/२०२६ रोजी चाकण उत्तर पोलीस स्टेशन हद्दीत अन्न व औषध प्रशासन विभागास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, चाकण उत्तर पोलीस स्टेशनचे तपास पथक व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. सदरच्या कारवाईत तळेगाव चौक येथे सायंकाळी १७.४५ वा. दरम्यान सापळा रचून नाशिक–पुणे रोडवरून नाशिककडून पुण्याच्या दिशेने येणारा टाटा कंपनीचा कंटेनर क्र. MH 18 BZ 2350 संशयावरून अडवून त्याची तपासणी करण्यात आली. सदरच्या तपासणीत कंटेनर मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा/पानमसाला असा सुमारे ९३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कंटेनर चालक नफीस मेहबूब खान, वय ४० वर्षे, रा. फिरोजपूर, हरियाणा यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास PSI मोरखंडे हे करीत आहेत.

सदर गुन्ह्यामध्ये इतर ४ आरोपी निष्पन्न झाले असून ते पाहिजे आरोपी आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकाकडून तपास सुरू आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आव्हाड, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. बसवराज तेली, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ श्री. मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग श्री. योगेश रांजणकर, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी श्री. दिगंबर भोगावडे, सह आयुक्त, पुणे विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चाकण उत्तर पोलीस स्टेशन श्री. जितेंद्र कदम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण उत्तर पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, पो. ह. ढमढेरे, कोळेकर, पोलीस शिपाई कोळी, लोखंडे, सांडभोर, जगझाप तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी श्री. मरेवार, सावळे, भिसे, हाके व लोहार यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!