Welcome to TIMES OF MAHARASHTRA   Click to listen highlighted text! Welcome to TIMES OF MAHARASHTRA
महाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना; सभासद नोंदणी सुरू

महात्मा गांधी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना; सभासद नोंदणी सुरू

राजगुरुनगर (खेड) | २९ सप्टेंबर २०२६

मुख्य संपादक : डॉ. निरंजन खंडागळे
सह संपादक : श्री कैलास केदारी

राजगुरुनगर : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी, राजगुरुनगर (खेड), पुणे संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करण्याचा संस्थेने मनोदय व्यक्त केला असून, संघाच्या सभासद नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.

सन १९३८ मध्ये स्थापन झालेली खेड तालुका एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून, संस्थेचे महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हे अनेक पिढ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कार व ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. विद्यालयातून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.

विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत संस्थेशी असलेला ऋणानुबंध अधिक दृढ करावा, तसेच आजी-माजी विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे नवे व्यासपीठ निर्माण व्हावे, या उद्देशाने माजी विद्यार्थी संघाची संकल्पना पुढे आली आहे.

माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख उद्देश

माजी विद्यार्थ्यांना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणणे, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करणे, आजी-माजी विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक दृढ करणे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणे, हे संघाचे प्रमुख उद्देश आहेत.

याशिवाय सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक तसेच अन्य विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सध्याच्या विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठीही संघाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

विद्यालयाशी असलेले नाते पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहावे आणि माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग सध्याच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्हावा, असा संस्थेचा प्रयत्न आहे.

माजी विद्यार्थ्यांनी सभासद नोंदणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

सभासद नोंदणीसाठी लिंक :
https://forms.gle/Qmcyafawdzkzbway8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!